मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतून देवेंद्र फडणवीसांसह भाजपावर निशाणा साधला. राज्यपालांच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तर दिलं. यावेळी विरोधकांनी करोना परिस्थितीहून सरकारच्या कामावर उपस्थित केलेल्या प्रश्नांना ठाकरे यांनी उत्तर दिलं. यावेळी ‘पुन्हा येईन… पुन्हा येईन’वरुन ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभेत बोलता मुख्यमंत्री म्हणाले, “आपण फेसबुक लाईव्हचा उल्लेख केला. मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला. काय करावं? काय करू नये, हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम असा झाला. ज्या लोकांनी मला संपर्क केला. जो मला प्रतिसाद मिळाला, त्यात महाराष्ट्रातील जनता मला मानायला लागले. ही माझ्या आयुष्यातील मोठी कमाई आहे. पण, मी नेमकं काय करत होतो. आज जी परिस्थिती तयार झाली आहे, करोनाची पुन्हा दुसरी लाट येतेय की काय? अशी शक्यता आहे. रुग्णसंख्या वाढतेय. लॉकडाउन करायचा की नाही. मी फेसबुक लाईव्हमधून तेच सांगत होतो. निष्काळजीपणा करू नका. कारण हा व्हायरस आहे. तो म्हणतोय मी पुन्हा येईन… पुन्हा येईन. काळजी घ्या. दुर्दैवानं थोडसं इकडेतिकडे झालं आणि व्हायरस पुन्हा परत आला,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला.

“माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेचा फायदा करोना लसीकरणामध्ये होत आहे. सध्या मी जबाबदार योजना राबवली जात आहे. सरकार काम करत आहे. देशातील सर्वात मोठं जंम्बो कोविड हॉस्पिटल सरकारनं राज्यात उभारलं. महाविकासआघाडी सरकारनं करोना काळात नागरिकांना ५ रुपयांना शिवभोजन थाळी दिली. आम्ही रिकाम्या थाळ्या वाजवल्या नाही. राज्यपालांनी सरकारच्या कामाचं कौतुक केलं आहे. विरोधकांनी नुसत्याच थाळ्या वाजवल्या,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावाला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra budget session updates uddhav thackeray slam devendra fadnavis bmh
First published on: 03-03-2021 at 16:28 IST