News Flash

कृपा करा गर्दी कमी करा; सगळं बंद करण्याची वेळ आणू नका : मुख्यमंत्री

सरकारनं दिलेल्या सुचनांचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

“घाबरून युद्ध जिंकलं जात नाही. लोकांनी घाबरून जाऊ नये. सरकारी यंत्रणा जिवाची परवा न करत लढत आहे. सरकारनं दिलेल्या सर्व सुचना नागरिकांनी सर्व पाळाव्या. राज्यात आवश्यक वस्तूंचा पुरेसा पुरवठा आहे. लोकल, बसमधील गर्दी ओसरली आहे. लोकांनी घरातून बाहेर पडू नये. सरकारनं दिलेल्या सुचना पाळून लोकांनी गर्दी कमी करावी. सरकार काही गोष्टी बंद करू शकतं, पण तसं करण्याची सरकारची इच्छा नाही, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. आज करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला.

“करोनाचा व्हायरस हळूहळू वाढतोय. काळजीची गरज नाही परंतु नागरिकांनी सुचनांचं पालन केलंय. घाबरून जाऊन चालणार नाही. ज्याला हा आजार झालाय ती व्यक्ती अपराधी नाही. त्यांनी आपला परदेशवारीचा इतिहास लपूव नये. जर त्यांनी असं केलं तर ते चूक आहे. बाहेरून येणाऱ्यांसाठी क्वारंटाईनची सुविधा सुरू करत आहोत. ज्यांच्यात करोनाची लक्षण आढळली त्यांच्यासाठी आयसोलेशनचीही सुविधा सुरू करत आहोत,” असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. “राज्यातील चाचणी केंद्र सुरू करण्यावर आज पंतप्रधानांशी चर्चा झाली आहे. तसंच आरोग्यमंत्र्यांशीही चर्चा करण्यात आली आहे. त्यांनीही आवश्यक ती पावलं उचलण्याचं आश्वासन दिलंय. राज्यातील चाचणी केंद्र वाढवण्यासही ते मदतीसाठी तयार आहेत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्र्यांची भावनिक साद
“कोणीही घाबरून चालणार नाही. यंत्रणेवरचा भारही कमी करणं आपलं काम. यंत्रणेचं काम सुरू ठेवणं आपल्या हातात असतं. ती सुद्धा माणसं आहेत, कोणाचे कुटुंबीय आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सरकारनं दिलेल्या सर्व सुचना नागरिकांनी पाळाल्या पाहिजे. संकटाला जात धर्म नसतो. एकजुटीनं आपण याविरोधात लढायला हवं. सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 12:36 pm

Web Title: maharashtra cm uddhav thackeray spreaks about coronavirus people should take precautions jud 87
Next Stories
1 Coronavirus: “काळजी करु नका”, सिंगापूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी उद्धव ठाकरे सरसावले
2 CoronaVirus : ‘तुम्ही स्वत:ला आणि तुमच्या प्रियजनांना संकटात टाकू नका’
3 Coronavirus : शहापुरात सापडला लो रिस्क संशयित रुग्ण
Just Now!
X