पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराच्या निमित्ताने अजित पवार गुरुवारी पंढरपुरात होते. अजित पवारांच्या उपस्थितीत पंढरपुरात सभा पार पडली. यावेळी भाजपा नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. दरम्यान अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे भाषणावेळी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी मास्क काढा अशी चिठ्ठी पाठवणाऱ्या कार्यकर्त्यालाही त्यांनी चिमटा काढला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर अजित पवारांवर कारवाई करा”; चंद्रकांत पाटलांचं आव्हान
अजित पवारांच्या सभेत प्रचंड गर्दी; कारवाई होणार का? भाजपाचा सवाल

अजित पवारांचं भाषण सुरु असतानाच त्यांच्याकडे एक चिठ्ठी आली. अजित पवारांनी यावेळी सर्वांसमोर चिठ्ठी वाचून दाखवत “दादा मास्क काढा, आवाज व्यवस्थित येत नाही” असं लिहिलं असल्याचं सांगितलं. “मी मास्क काढत नाही, का तर मी जनतेला सांगतोय मास्क लावा. म्हणून मी मास्क लावून बोलतोय…तरी हा शहाणा सांगतो मास्क काढा. याला काय जातं सांगायला,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्याला सुनावलं.

अरे तुम्हाला कुठे घालायची घाला ना
दरम्यान अजित पवारांच्या उपस्थितीत भाजपा नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावरुन अजित पवारांना भाजपा नेत्यांना टोला लगावला. “भाजपा सोडू नये म्हणून काही नेत्यांनी दोन तीन दिवस कल्याणरावांच्या घरी जाऊन बसायचे. त्याआधी कल्याणरावांची आठवण आली नाही. पण जेव्हा कळालं की, कल्याणराव काळे पवार साहेबांकडे चालले, की काही जणांच्या पोटात दुखायला लागलं. अरे तुला कुठं घालायची घाल ना…आम्हाला त्यात काय करायचं आहे,” असं अजित पवार म्हणाले.

“शरद पवार साहेबांचा कल्याणराव काळे यांना निरोप आहे, की भगीरथ चांगल्या मतांनी निवडून आला पाहिजे.” असंही अजित पवार यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra deputy cm ajit pawar pandharpur corona mask sgy
First published on: 08-04-2021 at 17:51 IST