वाई : मराठा आरक्षणाबाबत लक्ष घालावे व मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी आग्रही मागणी माढय़ाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन केली आहे.

निंबाळकर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात विविध विषयांसाठी भेट घेतली. या वेळी त्यांनी राज्यपालांना निवेदन दिले.

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
What was the cause of the Rwandan genocide 30 years ago
१०० दिवसांत ८ लाखांची कत्तल…३० वर्षांपूर्वीच्या रवांडा नरसंहाराचे कारण काय होते? सद्यःस्थिती काय?
Fee waiver students
दुष्काळग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या किती विद्यार्थ्यांना शुल्कमाफी?

मराठा समाजातील युवकांचे बरेच प्रश्न अतिशय जटिल बनले असून मराठा समाजातील  युवकांना नोकरी मिळवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मराठा समाजातील अनेक युवकांना शिक्षणापासून व उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण अत्यंत महत्त्वाचे असून याबाबत आपण स्वत: पाठपुरावा करून मराठा आरक्षण मिळण्याबाबत प्रयत्न करावेत, असेही खासदार निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देताना राज्यातील सद्य:स्थितीत असणाऱ्या कोणत्याही समाजाचे आरक्षण काढून न घेता मराठा समाजाला स्वतंत्ररीत्या आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मराठा समाजातील सर्वच नेतेमंडळी करीत आहेत. याउलट ज्या इतर समाजातील नेतेमंडळी मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत आग्रही आहेत, त्यांचाही पाठिंबा घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे आहे, असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या निदर्शनास आणून दिले.