महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण २६ हजार ३९५ पोलिसांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी २५ हजार ५९५ पोलिसांनी करोनावर मात केली आहे. तर करोनाची लागण होऊन आत्तापर्यंत २८३ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मागील २४ तासात ९५ पोलिसांना करोनाची बाधा झाली आहे. आत्तापर्यंत २८३ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. दरम्यान आत्तापर्यंत २४ हजार ५९५ पोलीस कर्मचाऱ्यांनी करोनावर मात केली आहे. तर राज्यात सध्या १ हजार ५१७ पोलिसांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ५ हजार ९०२ रुग्ण करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ७ हजार ८८३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत १४ लाख ९४ हजार ८०९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा आता ८९.६९ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये १५६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.