News Flash

जेव्हा महाराष्ट्र पोलीस आईच्या भूमिकेत शिरतात…

सोशल मीडियावर दिल्या मातृ दिनाच्या शुभेच्छा

आई या दोन शब्दांमध्ये आपल्या प्रत्येकाचं संपूर्ण आयुष्य सामावलेलं असतं. आपण कितीही मोठे झालो तरीही आज छोट्या-छोट्या गोष्टींसाठी पहिला फोन आईलाच करतो. १० मे रोजी संपूर्ण जगभरात मदर्स डे साजरा केला जातो. सध्या संपूर्ण जगभरासह भारतावर करोना विषाणूचं सावट पसरलेलं आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलेलं आहे. या खडतर काळातही डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, पोलीस रस्त्यावर उतरुन आपलं कर्तव्य बजावत आहेत.

महाराष्ट्र पोलिसांनी आजच्या मदर्स डे चं औचित्य साधून आपल्या नेहमीच्या जिवनात आई आपली कशी काळजी घेते, त्याचप्रमाणे पोलीसही तुमची अशीच काळजी घेतील हा विश्वास सर्वांना दिला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या या ट्विटला नेटकऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे.

कशी झाली मदर्स डेची सुरुवात ?

आईला सन्मान देणारया मातृत्वदिनाची पहिली सुरुवात झाली ती अमेरिका देशात. अ‍ॅक्टिविस्ट अ‍ॅना जार्विस आपल्या आईवर खूप प्रेम करायची. तिने ना लग्न केले ना मुलं जन्माला घातली. आईचा मृत्यू झाल्यावर तिने या दिवसाची सुरुवात केली. मग हळू हळू अनेक देशांमध्ये हा दिवस साजरा करायला सुरुवात केली.

मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी का साजरा करतात मदर्स डे ?

९ मे १९१४ रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा पास केला. ज्यामध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जाईल. त्यानंतर मदर्स डे अमेरिकासह इतर देशांमध्ये याचदिवशी साजरा केला जाऊ लागला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2020 9:22 am

Web Title: maharashtra police wishes mothers day in unique emotional way psd 91
टॅग : Mothers Day
Next Stories
1 Mother’s Day Open Letter: आई तू सोशल नेटवर्किंगवर आली अन्…
2 तुमच्या साध्या टीव्हीला बनवा ‘स्मार्ट’, Xiaomi ने लॉन्च केलं भन्नाट डिव्हाइस
3 PUBG Mobile साठी नवीन अपडेट, शानदार फीचर्समुळे अजून वाढली गेमची मजा
Just Now!
X