करोना संकटातून सावरलेल्या महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. एकीकडे लसीकरणाची तयारी सुरु असताना राज्यात गेल्या २४ तासात ३४५१ नवे करोना रुग्ण सापडले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.७ टक्के झालं असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

“राज्यात गेल्या २४ तासात ३४५१ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर २४२१ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १९ लाख ६३ हजार ९४६ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ३५ हजार ६३३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.७ टक्के झालं आहे,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात गेल्या २४ तासात ३० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत ५१ हजार ३९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.