26 November 2020

News Flash

महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट, जाणून घ्या किती रुग्ण झाले बरे?

महाराष्ट्रात मागील चोवीस तासांमध्ये १०० पेक्षा जास्त मृत्यूंची नोंद

आज महाराष्ट्रात ५ हजार ३६३ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातल्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. तर महाराष्ट्रात ७ हजार ८३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण १४ लाख ७८ हजार ४९६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात मागील चोवीस तासांमध्ये ११५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातला मृ्त्यूदर २.६३ टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८७ लाख ३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ५४ हजार २८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५ लाख २८ हजार ९०७ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर १३ हजार २३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला १ लाख ३१ हजार ५४४ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आज राज्यात ५ हजार ३६३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या १६ लाख ५४ हजार २८ इतकी झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 8:26 pm

Web Title: maharashtra reports 5363 new covid19 cases 7836 recoveries in last 24 hours scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 दसरा मेळाव्याचे नव्हे शिमग्याचे भाषण; चंद्रकांत पाटील यांचा पलटवार
2 खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यंदा शैक्षणिक शुल्क वाढ करु नये – अमित देशमुख
3 पराभव साजरा केला तर त्यात गैर काय?-पंकजा मुंडे
Just Now!
X