महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने निकाल पाहता येईल. फेरपरीक्षेचा निकाल आल्यानंतर विद्यार्थांना त्यांचे पुनर्मुल्यांकन करता येईल. तसेच विद्यार्थांना पुढील शैक्षणिक प्रवेशही घेता येईल. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थांना बैठक क्रमांक आणि आईचे नाव लागेल. या दोन्हींशिवाय निकाल पाहता येणार नाही.

राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी ही माहिती दिली. १७ जुलै ते ३० जुलैदरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती. मार्चमधील परीक्षेत उत्तीर्ण होऊ न शकलेल्या किंवा श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. मंडळाने शुक्रवारी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.

निकालासाठीची संकेतस्थळे

mahresult.nic.in
maharashtraeducation.com
hscresult.mkcl.org
विद्यार्थ्यांना या संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल आणि प्रिंट आऊटही घेता येईल.

असा पाहा निकाल –
वरीलपैकी एका संकेत स्थळावर जा
संकेत स्थळावर स्थाळावर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
आसनक्रमांक टाका
निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल

वरील संकेस्थळांवर विद्यार्थ्यांना १ वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे. तसंच मेसेजच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल मिळेल. त्यासाठी आसनक्रमांक नोंदवून ५७७६६ या क्रमांकावर मेसेज पाठवावा.