पारनेर : मुलीचा सांभाळ करून तिचे लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून तिच्या आईवर गेली तीन वर्षे अत्याचार तसेच अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या नराधमास पारनेर पोलिसांनी अटक केली आहे.

२०१७  पासून रावसाहेब विधाटे (रा. म्हैसगाव आग्रेवाडी, ता. राहुरी) हा  पीडित महिलेच्या मुलीच्या लग्नाचा, तिला सांभाळण्याच्या आमिषाने पीडितेस तिच्या संमतीशिवाय पळशी (पारनेर) येथे, तसेच म्हैसगांव (आग्रेवाडी, राहुरी) येथे वेळोवेळी अत्याचार करायचा. अनैसर्गिक कृत्येही करण्यास भाग पाडायचा. त्यास विरोध केल्यास लाथा बुक्कय़ांनी मारहाण करायचा. अलीकडेच फिर्यादीच्या मुलीने दवाखान्यातील उपचारांसाठी पैशांची मागणी केली असता आरोपीने शिवीगाळ करून, तुझा व माझा काही संबंध नाही, तू तुझ्या घरी निघून जा. माझ्या विरोधात कुठे तक्रार केली तर तुला व तुझ्या आईला जिवंत ठेवणार नाही अशी धमकीही दिली. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रावसाहेब विधाटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यास अटक करण्यात आली.