22 October 2020

News Flash

पुणे – सेक्स करण्यास नकार दिल्याने समलैंगिक पार्टनरवर कोयत्याने हल्ला

आपल्या समलैंगिक पार्टनरवर चाकू हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाला अटक केली आहे

प्रतिनिधिक छायाचित्र

आपल्या समलैंगिक पार्टनरवर चाकू हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी तरुणाविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. समलैंगिक संबंधाना मान्यता देणारा कायदा मंजूर झाल्यानंतर या प्रकारचा पुण्यातील हा पहिलाच गुन्हा ठरला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादी हा व्यावसायिक असून त्याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. काही कालवधीत त्याचा घटस्फोटदेखील झाला होता. दोन वर्षांपूर्वी त्याची एका तरुणाशी ओळख झाली होती. ते दोघे सतत भेटत असत आणि दोघांमध्ये जवळीक वाढली. दोन वर्षांपासून दोघांमध्ये संबंध होते.

फिर्यादी शुक्रवार पेठेत राहत असून तो वारंवार शरीरसुखाची मागणी करीत होता. या प्रकाराला कंटाळून आरोपी तरुणाने बुधवारी सकाळी फिर्यादी झोपेत असताना कोयत्याने वार केले. यात फिर्यादी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपीस अटक करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2018 1:56 pm

Web Title: man stabs gay partner after he refused sex in pune
Next Stories
1 पुणे हिट अँड रन: आजी नातवाच्या मृत्यूप्रकरणी महापालिका अधिकाऱ्याच्या मुलाला अटक
2 रेल्वेत चहा, कॉफी महागली
3 जागा कमी; विद्यार्थी जास्त!
Just Now!
X