05 March 2021

News Flash

मराठा आरक्षणावर आम्ही ठाम; विरोधकांनी अडथळा आणू नये – मुख्यमंत्री

आरक्षणाचा अहवाल मांडण्याच्या भूमिकेवर विरोधक ठाम आहेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षणावर आम्ही ठाम आहोत, त्यामुळे यामध्ये विरोधकांनी अडथळा आणू नये असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढण्यासाठी विधीमंडळात गटनेत्यांसोबतची बैठक घेण्यात आली. मात्र ही बैठक कोणताही तोडगा न निघताच संपल्याने आरक्षणाबाबत नेमके काय होणार हे समजू शकले नाही. तर दुसरीकडे आरक्षणाचा अहवाल मांडावा या भूमिकेवर विरोधक ठाम आहेत. तर पुढील रणनिती ठरवण्यासाठी विधिमंडळात विरोधक आमदारांची बैठक सुरु आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचे विधेयक गुरुवारी विधानसभा आणि विधानपरिषदेत मांडण्यात येणार आहे. परंतु विरोधकांनी यावर नाराजी व्यक्त केली असून अहवाल सादर न करताच विधेयक मांडण्याला त्यांनी विरोध दर्शवला होता. तसेच सभागृहात गोंधळ घालत जोपर्यंत अहवाल सादर होत नाही, तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही असा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. मराठा आरक्षण उपसमितीची पहिली बैठक सोमवारी पार पाडली. या बैठकीत आरक्षणाच्या विधेयकाचे प्रारुप ठरवण्याबाबत सखोल चर्चा झाली.

सरकारने आरक्षणाबाबतचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात मांडावा यासाठी विरोधक आग्रही आहेत. मागासवर्ग आयोगाच्या अहवालात एकूण ५२ टक्के आरक्षणाला आणि ओबीसींच्या प्रवर्गाला धक्का न लागता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देण्याबाबत सूचना करण्यात आली आहे. या सुचनेनुसार विधेयकाचे प्रारुप ठरवण्यात येणार आहे. हा अहवाल सरकारकडे आल्यानंतर तो सभागृहात मांडण्यात यावा अशी मागणी विरोधक सातत्याने करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 11:46 am

Web Title: maratha reservation bill meeting is over without any conclusion in the legislative assembly
Next Stories
1 जाणून घ्या गोवर-रुबेला लसीकरण का महत्त्वाचे
2 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
3 गेल्या नऊ वर्षांत दिवसाला सरासरी एका शेतकऱ्याची आत्महत्या!
Just Now!
X