19 October 2019

News Flash

मराठा आरक्षण मृगजळ, नादी लागू नका-संभाजी ब्रिगेड

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्ह आहे असेही अविनाश गायकवाड यांनी म्हटले आहे

मराठा आरक्षण हे मृगजळासारखे आहे, त्याच्या नादी लागू नका असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या अविनाश गायकवाड यांनी केले आहे. मराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई उच्च न्यायलयाच्या आवारत हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडा असं आहे असं प्रवीण गायकवाड यांनी म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी हे आरक्षण म्हणजे मृगजळासारखे आहे त्याच्यावर अवलंबून राहू नका असे म्हणत अपवाद म्हणून हे आरक्षण देण्यात आलं आहे असंही प्रवीण गायकवाड यांनी दिलं आहे

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला झाला त्याचा मी निषेध करतो. मात्र मराठा समाजाच्या अस्वस्थेतून हा हल्ला झाला असावं. मराठा आरक्षणाचा घास हाता-तोंडाशी आला आहे. मात्र तो हिरावला जातो की काय? असे मराठा तरूणांना वाटते आहे. त्याचमुळे मराठा तरूण अस्वस्थ आहेत. मराठा तरूणांच्या अस्वस्थतेतूनच हा हल्ला झाला असावा असे मला वाटते आहे. दोन अडीच-कोटी लोक रस्त्यावर येऊन आपली भूमिका मांडतात. त्यांना आरक्षण देण्याची घोषणा होते. पण कोर्टात त्याला आव्हान दिले जाते. या सगळ्या गोष्टी अस्वस्थ करणाऱ्या आहेत. मात्र गुणवंत सदावर्ते यांच्यावर झालेला हल्ला गैर आहे त्याचा मी निषेध करतो असेही प्रवीण गायकवाड यांनी म्हटलं आहे.

First Published on December 10, 2018 2:44 pm

Web Title: maratha reservation is like a oasis says pravin gaikwad sambhaji brigade