मराठी तसंच हिंदी मालिका आणि सिनेमांमधून विविध भूमिका साकारणारी अभिनेत्री क्षिती जोग आता एका वेगळ्या भूमिकेत चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आजवर अभिनेत्री म्हणून नावाजलेली क्षिती आता मराठी सिनेसृष्टीत एक नवीन भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. क्षिती आता ‘चलचित्र कंपनी’ च्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात प्रवेश करतेय.

‘झिम्मा’ या सिनेमाच्या माध्यमातून क्षिती निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकतेय. काही दिवसांपूर्वीच या सिनेमचा धमाल ट्रेरल रिलीज झालाय. या सिनेमात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले आणि सिद्धार्थ चांदेकर अशी दमदार स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे.

vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
34.37 lakh crore tax revenue target of the Central government is completed
केंद्राचे ३४.३७ लाख कोटींचे कर महसुलाचे उद्दिष्ट पूर्ण

‘झिम्मा’ या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच या सिनेमाविषयी सर्वांना उत्सुकता होती. टिझरलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रेक्षकांनीच नाही तर अनेक हिंदी-मराठी कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया हॅन्डल्स वरून या सिनेमाला शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे ‘झिम्मा’च्या निमित्ताने हेमंत आणि क्षितीची ही ऑफस्क्रीन जोडी पहिल्यांदाच दिग्दर्शक -अभिनेत्री म्हणून एकत्र काम करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by kshitee jog (@kshiteejog)

आपल्या निर्मिती क्षेत्रातील नवीन प्रवासाबद्दल क्षिती सांगते, ”खरं सांगायचं तर निर्मिती क्षेत्रात येताना आपल्या जवळचा आपला फेवरेट विषय घेऊन यायचं असं ठरलं होतं आणि झिम्मा ने ती संधी दिली! ज्या पद्धतीचे चित्रपट आपल्याला बघायला आवडतात तसे चित्रपट आपण बनवायचे हे मी पक्क ठरवलं होतं! आता झिम्मा तयार झाल्यावर आपल्या मनासारखं घडल्याचा आनंद आहे! समाधान आहे. प्रवास आणि चित्रीकरणाच्या निमित्ताने झालेला आमच्या सात जणींचा प्रवास खरोखर खूपच रंजक होता. या निमित्ताने मला माझ्या मैत्रिणींसोबत काम करता आले. हेमंतचं दिग्दर्शन जवळुन बघता आलं. पुन्हा प्रेमात पडता आलं.”
जवळपास वर्षभराने इतकी मोठी स्टारकास्ट असलेला आणि धमाल सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 26 एप्रिलला ‘झिम्मा’ सिनेमा रिलीज होतोय.