मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगद्याजवळ मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडुन द्रुतगती महामार्गावरील खंडाळा बोगदा (पुणे व मुंबई लेन) येथील कि.मी. 46.710 ते 46.579 दरम्यान ढिले झालेले दरडीचे दगड काढण्याचे काम 12 मार्च ते 20 मार्च दरम्यान करण्यात येणार असल्याने महामार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. पुणे प्रादेशिक विभागाचे महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी ही माहिती दिली आहे.

दरडी काढण्याचे काम सुरु असताना पुणे आणि मुंबई लेनवरील वाहतूक प्रत्येक 15 मिनिटांकरिता बंद करण्यात येणार आहे. 12 मार्च ते 20 मार्च दरम्यान खालील वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

– ब्लॉक 1 :- सकाळी 10 ते सकाळी 10.15
– ब्लॉक 2 :- सकाळी 11 ते सकाळी 11.15
– ब्लॉक 3 :- दुपारी 12 ते दुपारी 12.15
– ब्लॉक 4 :- दुपारी 2 ते दुपारी 2.15
– ब्लॉक 5 :- दुपारी 3 ते दुपारी 3.15

दरड काढण्याचे काम करताना पुणे व मुंबई लेन वरील वाहतुक दिवसभरातुन 5 वेळा 15 मिनिटाकरिता पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे. तसेच 15 मार्च रोजी दुपारी 3.15 वाजल्यापासुन 18 मार्च रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत वाहतूक चालु ठेवण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाने प्रवास करणार्‍या सर्ववाहन चालंकानी व प्रवाशांनी या मेगा ब्लॉकची नोंद घ्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी केले आहे. तसंच मुंबई-पणे द्रुतगती महामार्गाने प्रवास करणाऱ्या सर्व वाहन चालकांनी व प्रवाशांनी महामार्ग पोलिसांनी सहकार्य करण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे.