News Flash

MHT CET 2021 Exam Dates : सप्टेंबरमध्ये दोन टप्प्यात होणार परीक्षा; जाणून घ्या तपशील

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत एमएचटी-सीईटीसह विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटीच्या तात्पुरत्या तारखा जाहीर केल्या

MHT CET 2021 exam dates MHT CET 2021
सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) व्यावसायिक आणि बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीईटी घेतल्या जातात. (प्रातिनिधिक फोटो सौजन्य पीटीआयवरुन साभार)

राज्यात अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट, व्यवस्थापनशास्त्र आदी विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) २६ ऑगस्टपासून होणार आहेत. तर बारावीनंतरच्या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची सीईटी ४ ते १० सप्टेंबर आणि १४ ते २० सप्टेंबर अशा दोन सत्रांत होणार आहे. सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) व्यावसायिक आणि बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीईटी घेतल्या जातात. करोनाच्या प्रादुर्भावामुळे ही प्रक्रिया यंदा लांबली आहे. तसेच नुकताच बारावीचा निकालही जाहीर करण्यात आला आहे. या पाश्र्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत एमएचटी-सीईटीसह विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटीच्या तात्पुरत्या तारखा जाहीर केल्या.

आणखी वाचा- Scholarship Exam : शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला होणार परीक्षा

औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, कृषि या बारावीनंतरच्या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठीची एमएचटी-सीईटी ४ ते १० सप्टेंबर आणि १४ ते २० सप्टेंबर अशा दोन सत्रांत होईल. तर, व्यवस्थापनशास्त्र (एमबीए), हॉटेल मॅनेजमेंट, (पान २ वर) (पान १ वरून) वास्तुकला आदी अभ्यासक्रमांच्या सीईटी २६ ऑगस्टपासून सुरू होतील. तर शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षणशास्त्र, एकात्मिक शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाची सीईटी २६ ऑगस्टपासून सुरू होईल. तर तीन वर्षे मुदतीचा विधी अभ्यासक्रम (एलएलबी), पाच वर्षे मुदतीचा विधी अभ्यासक्रमाची (एलएलबी) सीईटी १६ सप्टेंबरपासून सुरू होईल, असे सामंत यांनी सांगितले. करोनाच्या परिस्थितीनुसार या तारखांमध्ये बदल होऊ शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2021 12:37 pm

Web Title: mht cet 2021 exam dates announced in september in two phases scsg 91
Next Stories
1 Scholarship Exam : शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला होणार परीक्षा
2 कर्नाटक सरकारच्या करोना नियमांविरोधात शिवसेनेचे धडक आंदोलन
3 कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम
Just Now!
X