शिवसेना प्रवेशाचा निर्णय; पंढरपूर, अक्कलकोटविषयी उत्सुकता

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ात राष्ट्रवादीला लागलेली गळती सुरूच असून बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला.

Amol Kolhe, Dilip Mohite, Shirur,
शिरूरमध्ये ‘महागद्दारी’वरून खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार दिलीप मोहिते यांच्यात खडाजंगी
What Amit Shah Said About Uddhav Thackeray And Sharad Pawar?
अमित शाह यांचा प्रहार! “नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी, अर्धी काँग्रेस असे अर्धवट..”
Rohit Pawars allegations against Eknath Khadse
रोहित पवार यांचा एकनाथ खडसे यांच्यावर आरोप, म्हणाले, ‘अटकेच्याच भितीने…’
NCP, sanjay Raut, sangli,
सांगलीत संजय राऊत यांच्या मदतीला राष्ट्रवादी का धावून गेली ?

सोपल हे मंगळवारी आमदारकीचा राजीनामा विधानसभेच्या सभापतींकडे सुपूर्द करणार असून नंतर दुसऱ्या दिवशी, बुधवारी मुंबईत सेनेत प्रवेश करणार आहेत.

आमदार सोपल यांच्याबरोबर याच दिवशी सोलापुरातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचाही शिवसेना प्रवेश होणार आहे. या दोन्ही नेत्यांच्या पाठोपाठ आता माढय़ाचे राष्ट्रवादीचे पवारनिष्ठ आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्यासह अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे व पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या संभाव्य राजकीय निर्णयाविषयीही उत्सुकता वाढली आहे.

अलीकडे करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षाला धक्का दिला होता. त्यानंतर आता बार्शीचे ज्येष्ठ आमदार दिलीप सोपल यांनीही सेना प्रवेशाचा निर्णय घोषित करून दुसरा धक्का दिला आहे. आमदार सोपल हे २००४ सालचा अपवाद वगळून १९८५ सालापासून विधानसभेवर प्रतिनिधित्व करतात. त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. आगामी बार्शीची विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी आहे. शिवसेनेकडून मिळेल ती जबाबदारी सांभाळण्यासाठी आपण सज्ज आहोत. आपण राष्ट्रवादीवर किंवा नेतृत्त्वावर नाराज नव्हतो. जनभावनेचा आदर करून आपण शिवसेनेत जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.