30 October 2020

News Flash

मोबाईलसाठी रागावल्याने मुलाची आत्महत्या

नियमितपणे शाळेतही जात नसे.

(संग्रहित छायाचित्र)

नागपूर : आईने मोबाईल हिसकावून रागावल्याने एका १४ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना शुR वारी सकाळी ११ वाजता हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गजानननगर परिसरात समोर आली.

वंश राजू इमला (१४) रा. गजानननगर असे मृताचे नाव आहे. तो आठवीत शिकत होता. तो एकुलता एक मुलगा होता. त्याची आई खासगी काम करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तो आईवडील आणि आजीसोबत गजानननगर परिसरात राहत असे. त्याला मोबाईलचे व्यसन होते. तो नियमितपणे शाळेतही जात नसे. यामुळे त्याच्या आईने त्याच्याकडील मोबाईल काढून घेतला. यामुळे तो चिडला होता, असे सांगितले जाते. त्याचे पालक नेहमीप्रमाणे कामाला निघाले. घरी आजी आणि तो एकटाच असताना त्याने घराच्या पहिल्या माळ्यावर गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी मोबाईल तपासला असता वंशला ‘पोर्न’ बघण्याची सवय असल्याचे मोबाईलच्या ‘इंटरनेट हिस्ट्री’तून लक्षात आल्याची माहिती काही विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 7:17 am

Web Title: mobile angry child suicide for mobile akp 94
Next Stories
1 शिवसेना कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही : उद्धव ठाकरे
2 शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत व्याजआकारणी नको!
3 आगामी दशक महाविकास आघाडीचेच ; आदित्य ठाकरे यांचा ठाम विश्वास
Just Now!
X