News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

जेट एअरवेजच्या विमानांची उड्डाणे, पंचांबरोबर वाद घातल्याने धोनी अडचणीत आणि वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या.,

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

1.मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याबाबत चीनला अल्टिमेटम

पाकिस्तानात वास्तव्यात असलेला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी ब्रिटन-फ्रान्सकडून चीनवर दबाव वाढवण्यात आला आहे. वाचा सविस्तर..

2.‘जेट’ अखेर जमिनीवर; डीजीसीआयच्या कारवाईनंतर प्रवाशांचा खोळंबा

तांत्रिक बाबींवरुन जेट एअरवेजच्या विमानांची उड्डाणे डायरेक्टोरेट जनरल ऑफ कमर्शियल इंटेलिजेंस अॅण्ड स्टॅटिस्टिक्सने (डीजीसीआय) रोखली आहेत. वाचा सविस्तर..

3.विदर्भात ६२ टक्के मतदान

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील दहापैकी सात मतदारसंघांत गुरुवारी रणरणत्या उन्हात सरासरी ६२ टक्के मतदान झाले. वाचा सविस्तर..

4.IPL 2019: मैदानात पंचांबरोबर वाद घातल्याने धोनी अडचणीत, आयपीएलने केली ही कारवाई 

आयपीएलच्या बाराव्या हंगामात जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानात राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात धोनीचं एक वेगळचं रुप त्याच्या चाहत्यांना पहायला मिळालं. धोनीने बाद झाल्यानंतर नो बॉलवरुन झालेल्या वादावरुन थेट डगाऊटमधून मैदानात येत पंचाशी वाद घातला. वाचा सविस्तर..

5.सुव्रत जोशी-सखी गोखलेचं शुभमंगल

अभिनेता सुव्रत जोशी आणि सखी गोखले गुरुवारी लग्नबंधनात अडकले. मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत नेरळ येथील फार्महाऊसवर हा विवाहसोहळा पार पडला. वाचा सविस्तर..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 9:46 am

Web Title: morning bulletin masood azhar jet airways ipl 2019 and other news
Next Stories
1 भारताची लोकसंख्या पोहोचली १३६ कोटींवर; वाढीचा दर चीनपेक्षा दुप्पट
2 मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याबाबत चीनला अल्टिमेटम
3 भाजपच्या ९० हजार बूथप्रमुखांसाठी ‘मोदी किट’
Just Now!
X