पिंपरी चिंचवड येथील मोशी कचरा डेपोला गुरूवारी लागलेली आग अजूनही धुमसते आहे. ही आग अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. ही आग लागली तेव्हा धुराचे लोट २ ते ३ किलोमीटर अंतरावरूनही दिसत होते. किरकोळ कारणाने लागलेल्या या आगीने नंतर रौद्ररुप धारण केले. ५० पेक्षा जास्त अग्निशामक बंबांनी ही आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला पण अजूनही त्यांना यश आलेले नाही. आग धुमसते आहे त्यामुळे कंट्रोल बर्निंग आणि कुलिंगचे काम सुरु आहे अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

गुरुवारी रात्री ८ वाजण्यचा्या सुमारास मोशी कचरा डेपोला आग लागल्याचे अग्निशमन दलाला समजले. सुरुवातीला अग्निशमन दलाचे ६ बंब आणि पाच खासगी टँकर याद्वार आगीवर नियंत्रण आणण्याचे काम सुरु होते. पण रात्रभर ही आग नियंत्रणात आली नाही. याआधी दहा वर्षांपूर्वीही अशीच घटना घडली होती. कचरा डेपो ८० एकरांच्या परिसरात आहे. त्यामुळे ही आग वाढतेच आहे. अग्निशमन दलाकडून ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

investor anthony bolton marathi
बाजारातली माणसं : प्रवाहाविरुद्ध जाणारा निधी व्यवस्थापक – अँथनी बोल्टन
nagpur, polling station,
मतदान केंद्रावरील कर्मचारीच म्हणतो, बोटाला शाई कशाला हवी?
air pollution control system has been in dust since three months
पिंपरी : हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तीन महिन्यांपासून धूळखात
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न