प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून पुरस्कारानं गौरविण्यात येणाऱ्या मान्यवरांची यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील तीन कर्तबगार व्यक्तींचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सुरेल गळ्यांनं गाण्यांमध्ये भाव भरणारे गायक सुरेश वाडकर ‘मदर ऑफ सीड्स’ अशी जगभरात ओळख मिळवणाऱ्या राहीबाई पोपेरे आणि आदर्श गाव योजनेचे प्रणेते पोपटराव पवार यांचाही पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

संकरित बियाणांचा प्रचंड वापर वाढलेला असताना राहीबाई पोपरे यांनी देशी आणि पारंपरिक बियाणांचं संकलन करत बियाणांची बँक तयार केली. लहानपणापासूनच बियाणे गोळा करण्याचा छंद जडलेल्या राहीबाई पोपेरे यांनी देशी वाणांच्या बियाणांच पारंपरिक पद्धतीनं सवर्धनं केलं. आज राहीबाई यांच्या सीड्स बँकमध्ये तब्बल ५४ पिकांचे ११६ जातींचे वाण आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक बियाणाविषयीची माहिती राहीबाईंना तोंडपाठ आहे. त्यांच्या या कार्याची बीबीसीनंही दखल घेतली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या हिवरे बाजार या गावाचा कायापालट करण्यात पोपटराव पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी गावात केलेल्या कामावरून महाराराष्ट्र सरकारनं आदर्श ग्राम योजना सुरू केली. यामुळे राज्यातील अनेक गावांचा चेहरामोहराच बदलून गेला.