News Flash

सुशांत मृत्यू प्रकरण- CBI तपासाबाबत मुंबई पोलीस आयुक्तांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले…

वाचा, काय म्हणाले आयुक्त परमबीर सिंग

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूच्या घटनेला जवळपास सहा महिने झाले आहेत. या प्रकरणात अद्यापही नक्की काय घडलं याचं कोडं उलगडलेलं नाही. सुरूवातीच्या काळात मुंबई पोलीस सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास करत होते. त्यानंतर जनभावना लक्षात घेता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. सीबीआयच्या तपासातून अनेकविध पैलू समोर आले पण अद्याप सुशांतच्या बाबतीत नक्की काय घडलं? याचं उत्तर सीबीआयने दिलेलं नाही. याच दरम्यान, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सुशांत प्रकरणातील सीबीआयच्या तपासाबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

“आता CBI सगळ्यांना पवित्र करेल”; भाजपा नेत्याचं भर कार्यक्रमात वक्तव्य

“सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत केला जात आहे. मला खात्री आहे की सीबीआयचे अधिकारी लवकरच या प्रकरणाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचतील. या प्रकरणाचा जो निष्कर्ष सीबीआयकडून काढला जाईल तो निष्कर्ष आमच्या तपासाशी मिळताजुळताच असेल. सर्वोच्च न्यायालयानेदेखील आम्ही केलेल्या तपासाला अतिशय ‘प्रोफेशनल’ तपास असं म्हटलं होतं. त्यामुळे सीबीआय या प्रकरणाचा जो निष्कर्ष काढेल तो आमच्या निष्कर्षासारखाच असेल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मराठी मालिकेतल्या घरंदाज सुनेच्या ‘बोल्ड & सेक्सी’ लूकची चर्चा… पाहा Photos

३० डिसेंबरला सुशांत मृत्यू प्रकरणाच्या तपासाबाबत सीबीआयकडून माहिती देण्यात आली होती. “सीबीआय अधिक व्यापक आणि तंत्रशुद्ध पद्धतीने तपास करत आहे. या प्रकरणातील वैज्ञानिक बाबीदेखील तपासल्या जात आहेत. तपासादरम्यान कोणताही विविध कंगोरे तपासले जात असून कोणतीही बाब दुर्लक्षित केली जात नाहीये”, अशी माहिती सीबीआयकडून देण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2021 5:10 pm

Web Title: mumbai police commissioner param bir singh comment on sushant singh rajput suspicious death case investigation by cbi vjb 91
Next Stories
1 मुख्यमंत्री साहेब सरकार निर्दयी कसे काय झाले? ‘मातोश्री’बाहेर मनसेचा बॅनर
2 “गौरी ज्या कारणाने तू आत्महत्या केलीस त्याला शिक्षा मिळेल, रक्ताचा असला तरी,” प्रशांत गडाख यांची भावूक पोस्ट
3 ..विचार करा करोना काळात पोलिसांनी वर्क फ्रॉम केलं असतं तर ?-उद्धव ठाकरे
Just Now!
X