28 September 2020

News Flash

बंद पडलेल्या कंटेनरला खासगी बसची जोरदार धडक, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात

एक्स्प्रेस-वेवर रविवार(दि.२२) हा अपघाताचा दिवस ठरला

पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस-वेवर रविवार(दि.२२) हा अपघाताचा दिवस ठरला आहे. खासगी बस आणि कंटेनरचा पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात एकाचा मृत्यू तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत. रमेश संजय कबाडे वय-२४ असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  तर सव्वा नऊच्या सुमारास मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या पोलीस व्हॅनचा टायर फुटून अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. दोन्ही अपघात हे ओझर्डे गावाच्या हद्दीत घडले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हल बस क्रमांक एम.एच-०३ सी.पी-९९०३ ही पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होती. तेव्हा, एक्स्प्रेस-वे लेन नंबर एकवर कंटेनर क्रमांक (एच.आर-५५ ए.डी-३९२८) बंद पडलेला होता. भरधाव वेगात असणाऱ्या ट्रॅव्हस बसने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघात एकाचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज पहाटे साडेपाचच्या सुमारास ओझर्डे गावाच्या हद्दीत घडली. तर, दुसऱ्या घटनेत मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या पोलीस व्हॅनचा टायर फुटून अपघात झाला. ही घटना आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास घडली असून यात सुदैवाने कोणीही जखमी नाही. अपघात झाला त्यावेळी व्हॅनमध्ये ऐकूण चार पोलीस कर्मचारी होते अशी माहिती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2019 11:05 am

Web Title: mumbai pune expressway accident between private travel bus and container sas 89
Next Stories
1 मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी प्रयत्न होत नाहीत
2 ज्येष्ठ नागरिकांनाही स्मार्ट व्यसनांचे वेड
3 ‘एल्गार’ प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा!
Just Now!
X