News Flash

मुंबई-पुणे द्रुतगतीवर गाडीचा किमान वेग ताशी ८० कि.मी. बंधनकारक  

अधिसूचना वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी जाहीर केली आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरील पहिल्या  मार्गिकेस(लेनमध्ये) कमी वेगाने वाहने चालवण्यास र्निबध घालण्यात आले आहेत. याबाबतची अधिसूचना वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी जाहीर केली आहे. त्यामुळे द्रुतगती मार्गावर पहिल्या मार्गावरून वाहने चालवताना ताशी ८० किलो मीटर वेगाने गाडी चालवणे बंधनकारक आहे. द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांनी डाव्या बाजूच्या मार्गिकेमधून, हलक्या वाहनांनी मधल्या मार्गिकेमधून वाहने चालवणे अपेक्षित आहे. तर उजव्या बाजूची पहिली मार्गिका ही वाहनांना पुढे जाऊ देण्यासाठी (ओव्हरटेकिंग)   राखीव ठेवणे अपेक्षित आहे. मात्र बरेचदा वाहनचालक पहिल्या  मार्गिकेमधून कमी वेगाने गाडी चालवतांना दिसतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक विभागाने नवीन अधिसूचना जारी केली आहे. या आदेशातून  रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने यांना वगळण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 3:55 am

Web Title: mumbai pune expressway speed limit
Next Stories
1 खरेदीअभावी तूर, हरभरा उत्पादक अडचणीत
2 विदर्भात यंदा तीव्र जलसंकट
3 वर्धा जिल्ह्य़ात शिवसेनेमध्ये कुरघोडीचे राजकारण
Just Now!
X