04 July 2020

News Flash

भाडेकरूकडून माजी उपजिल्हाधिकाऱ्याची पत्नीसह हत्या

अपघाती मृत्यू भासवण्याचा प्रयत्न फसला

संग्रहित छायाचित्र

भाडेकरूंनी घर मालक दाम्पत्याची हत्या केल्याची घटना शहरातील बळवंत कॉलनीमध्ये शुक्रवारी घडली. सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी नथ्थुराम उंद्राजी भगत व त्यांची पत्नी हेमलता नथ्थुराम भगत (७८) यांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत शुक्रवारी सकाळी आढळले होते.आरोपींनी अपघाती मृत्यू भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून रात्री आरोपींना जेरबंद केले.

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. पोलिसांना संशय आल्याने गतीने तपास करण्यात आला. यामध्ये हे दुहेरी हत्याकांड असल्याचे स्पष्ट झाले. घरातील सोन्याचे दागिने व इतर ऐवज असा एकूण पाच लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल हत्या करून लंपास करण्यात आला. शिवाय मृतदेह त्यांचे राहत्या घरात जाळून दोघांचाही अपघाती मृत्यू असल्याचे भासविण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. या प्रकरणी वंदना लक्ष्मणराव पाढेन (५८) यांच्या फिर्यादीवरून खदान पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२, ३९४, ३४ अन्वये गुन्हा नोंद करून तपास केला. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या नेतृत्वातील पथकाने गुन्हय़ातील मृतकांचे भाडेकरू असलेले आरोपी मोहम्मद रफिक मोहम्मद हमजा (४२) व मेहमुदाबी परविन वसिम खान (३८) यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यांनी गुन्हय़ाची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींना अटक करून चोरी गेलेला माल हस्तगत केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2020 12:42 am

Web Title: murder of former deputy collector along with his wife by a tenant abn 97
Next Stories
1 केश कर्तनालय दुकानदारांचे ‘माझे दुकान, माझी मागणी’ आंदोलन 
2 बछडय़ाची वाघिणीशी भेट घालून देण्यासाठी वनविभागाची धडपड
3 धुळ्यात २४ तासांत करोनाचे २३ नवीन रुग्ण
Just Now!
X