News Flash

पन्नास रुपयांसाठी मजुराचा खून

दारु पिण्यासाठी ५० रुपये दिले नाही याचा राग आल्याने परप्रांतीय बांधकाम मजुरावरचाकुने केलेल्या हल्यात त्याचा औषोधोपचार चालू असताना मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री

| May 19, 2014 02:05 am

दारु पिण्यासाठी ५० रुपये दिले नाही याचा राग आल्याने परप्रांतीय बांधकाम मजुरावर चाकुने केलेल्या हल्यात त्याचा औषोधोपचार चालू असताना मृत्यू झाला. ही  घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास साकुरी हद्दीत घडली. या बाबत राहाता पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
सोनुसिंह यादव (वय ३५, मुळ रा.मध्यप्रदेश) असे मयत मजुराचे नाव आहे. सोनुसिंह हा इतर मजुरांसमवेत साकुरी हद्दीतील हॉटेल फिलींग स्टेशनच्या पाठीमागे  अनिल तोरडमल यांचे बांधकाम चालू आहे. या ठिकाणी मयत सोनुसिंह हा मजुरीचे काम करीत होता.  शुक्रवारी आरोपी अक्षय दाभाडे हा तेथे येऊन सोनुसिंह याच्याकडे दारु पिण्यासाठी ५० रुपये मागत होता. सोनुसिंह याने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याचा राग येऊन आरोपी अक्षय दाभाडे याने सोनुसिंह याच्या छातीवर व पोटावर चाकूने वार केले. यामध्ये सोनुसिंह गंभीर जखमी झाला. ही घटना कुणाला सांगितली तर तुम्हालाही जीवे ठार मारु असा दम दाभाडे याने इतरांना दिला. सोनुसिंह यास उपचारासाठी साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात दाखल केले असता, उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
सुरतसिंह लोधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अक्षय दाभाडे यांच्याविरुद्ध राहाता पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2014 2:05 am

Web Title: murder of labourer for fifty rupees
टॅग : Rahata
Next Stories
1 लातुरात भाजप विजयाने काँग्रेसचे मनोबल खचले
2 लातुरात भाजप विजयाने काँग्रेसचे मनोबल खचले
3 शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी एस. टी.ची विनामूल्य सेवा
Just Now!
X