19 September 2020

News Flash

स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदीची मागणी, न्यायालयाची सरसंघचालकांना नोटीस

मोहनिस जबलपुरे यांनी नागपूरमधील न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पथसंचलनात स्वयंसेवकांनी हातात लाठी घेऊन सामील होणे हे नियमांचे उल्लंघन असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

(संग्रहित छायाचित्र)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या हातातील लाठीवर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका नागपूरमधील जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अतिरिक्त न्यायाधीशांसमोर या याचिकेवर सुनावणी झाली असून न्यायालयाने या प्रकरणी सरसंघचालक मोहन भागवत यांना नोटीस बजावली आहे.

मोहनिस जबलपुरे यांनी नागपूरमधील न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पथसंचलनात स्वयंसेवकांनी हातात लाठी घेऊन सामील होणे हे नियमांचे उल्लंघन असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. जबलपुरे यांनी याचिकेत म्हटले आहे की, सरसंघचालक मोहन भागवत आणि अनिल भोकरे यांनी स्वयंसेवकांना लाठी घेऊन पथसंचलनात सामील होण्याचे निर्देश दिले. मात्र, हा प्रकार म्हणजे नियमांचे उल्लंघन आहे. याचिकाकर्त्यांनी यासंदर्भात माहिती अधिकारांतर्गत पोलिसांकडूनही माहिती मागवली होती. पोलिसांनी पथसंचलनाला परवानगी देताना काही अटी ठेवल्या होत्या. यात पथसंचलनात लाठीचे प्रदर्शन करु नये किंवा बाळगू नये. तसेच याचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल, असे यात म्हटल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला आहे. याप्रकरणी याचिकाकर्त्यांनी पोलिसांकडेही धाव घेतली होती. पुरावे म्हणून छायाचित्रही दिले होते, मात्र, पोलिसांनी संघाशी संबंधितांवर कारवाई केली नाही, असे याचिकेत म्हटले होते.

सुरुवातीला जबलपुरेंनी कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, तिथे याचिका फेटाळण्यात आली. शेवटी या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायालयाने सरसंघचालकांना नोटीस बजावली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2018 3:37 pm

Web Title: nagpur court notice to rss chief mohan bhagwat on rss swayamsevak lathi
Next Stories
1 मराठा आरक्षण: 1 डिसेंबरला जल्लोषाची तयारी करा, मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान
2 राजीनामा मागण्याचा अधिकार केवळ अमित शाहंकडे : सुधीर मुनगंटीवार
3 डीएसकेंच्या अडचणीत आणखी वाढ, ‘महारेरा’ने दिला दणका
Just Now!
X