नंदुरबारमध्ये एसटी बस अपघाताचे सत्र सुरुच असून मंगळवारी ठाणेपाड्याजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली. या घटनेत ३० प्रवासी जखमी झाले असून जखमींवर नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नंदुरबारमधील ठाणेपाडा येथे मंगळवारी दुपारी नाशिकहून नंदुरबारकडे जाणाऱ्या बसने विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी बसला धडक दिली. ही बस नंदुरबारहून साक्रीला जात होती. या धडकेत ३० हून अधिक प्रवासी जखमी झाले. अपघाताचे वृत्त समजताच स्थानिकांनी मदत कार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. जखमींमध्ये दोन्ही बसच्या चालकांचा समावेश आहे. उप प्रादेशिक अधिकारी दिपक पाटील, नंदुरबार बस आगाराच्या प्रमुखांनी घटनास्थळाची पाहणी केली.

Pimpri, Leakage in water channel, moshi,
पिंपरी : मोशीत जलवाहिनीला गळती, हजारो लीटर पाणी वाया
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
ambulance caught fire in Yavatmal Fortunately four people including a pregnant woman survived
यवतमाळमध्ये धावती रुग्णवाहिका पेटली; गर्भवतीसह चार जण सुदैवाने बचावले
North East Mumbai Lok Sabha Constituency Citizens Health Issue
आमचा प्रश्न – ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न टांगणीला

ठाणेपाड्याजवळ सलग दुसऱ्या दिवशी एसटीचा अपघात झाला आहे. सोमवारी पुणे- नंदूरबार ही बस साक्री-नंदुरबार रस्त्यावर ठाणेपाडा येथून जात होती. या दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या प्रवासी जीपला बसने धडक दिली होती. या भीषण अपघातात ४१ प्रवासी जखमी झाले होते. लागोपाठ झालेल्या या अपघातांमुळे या मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.