महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ‘नो होल्डस बँरेड’ या आपल्या आत्मचरित्रातून आपल्या राजकीय प्रवासाचा लेखाजोखा मांडला आहे. या आत्मचरित्रामध्ये त्यांनी अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या खुलाशामुळे राजकीय वातावरण आधीच तापले होते. त्यात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नावाची भर पडली आहे. राणे यांनी आपल्या आत्मचरित्रातून राज ठाकरेंबद्दल दोन मोठे खुलासे केल्याचे समोर आले आहे. शिवसेना सोडण्यासाठी राज ठाकरे माझ्या सतत संपर्कात होते, असा गौप्यस्फोट राणेंनी आत्मचरित्रातून केल्याचे समोर आला आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याआधीच शिवसेनेतील अत्यंत आक्रमक नेते नारायण राणे यांनी शिवसेना सोडली होती.

पहिला गौप्यस्फोट – शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाला कंटाळून राज ठाकरे यांनी 2006 साली शिवसेना सोडली. त्यानंतर त्यांनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ नावाचा पक्ष स्थापन केला. ज्यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली, त्यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्याशी संपर्क साधला होता. आपण एकत्र येऊन नवीन पक्ष स्थापन करु, असं निमंत्रण राज ठाकरेंनी आपल्याला दिलं होतं, असा खळबळजनक गौप्यस्फोट नारायण राणे यांनी आत्मचरित्रात केला आहे. मात्र, राज ठाकरेंचं निमंत्रण नारायण राणेंनी नाकारलं.

दुसरा गौप्यस्फोट – राज ठाकरेंसोबत शिवसेनेतले जवळपास 38 आमदार होते. राज ठाकरेंनी शिवसेना सोडली, त्यावेळी हे 38 आमदारही पक्ष सोडणार होते. मात्र, प्रत्यक्षात 13 आमदारांनी सोडलं, असे नारायण राणेंनी आत्मचरित्रात म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला आणि शिवसेनाला मोठा धक्का बसला होता. महाराष्ट्रातील राजकीय गणिते बदलली होती. त्यामुळे आता नारायण राणे यांच्या या खुलाशाचे राज ठाकरे नेमकं काय उत्तर देताय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.