नाशिक – औरंगाबाद महामार्गावर भरधाव टँकरने शिवशाही बसला धडक दिली असून या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर १० ते १५ प्रवासी जखमी झाले आहेत.

नाशिक- औरंगाबाद राज्य मार्गावरील विंचूर येथे शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला. पेट्रोलच्या टँकरने शिवशाही बसला धडक दिली. धडकेनंतर बस उलटली आणि या भीषण अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला. १० ते १५ जण अपघातात जखमी झाले असून जखमींना निफाड येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. बसमध्ये एकूण ३५ ते ४० प्रवासी होते.

अपघाताचे वृत्त समजताच ग्रामस्थ, पोलीस व अन्य यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली. मृत्यू झालेल्या तसेच जखमी प्रवाशांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.