12 July 2020

News Flash

नाशिक जिल्ह्यातील ग्राहकांकडे महावितरणची ४८७ कोटींची थकबाकी

जिल्ह्यातील ग्राहकांकडे असलेली ४८७ कोटी रुपयांची थकबाकी कशी वसूल करायची, हा प्रश्न महावितरण कंपनीला सध्या सतावत आहे.

| March 20, 2014 01:02 am

जिल्ह्यातील ग्राहकांकडे असलेली ४८७ कोटी रुपयांची थकबाकी कशी वसूल करायची, हा प्रश्न महावितरण कंपनीला सध्या सतावत आहे. कृषिपंपांची ४३९.८२ कोटी, घरगुती व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांची ३७.०८ कोटी तर नगरपालिकांकडील पाणीपुरवठा योजनांचे १०.१४ कोटी रुपये थकीत आहेत.
जिल्ह्यात ग्रामीण व शहर असे दोन मंडळ आहेत. नाशिक ग्रामीण मंडळांतर्गत कळवण, मालेगाव, मनमाड, सटाणा, नाशिक ग्रामीण असे विभाग येतात. तर, नाशिक शहर मंडळांतर्गत नाशिक शहर (१) आणि नाशिक शहर (२) असे विभाग येतात. सद्यस्थितीत सर्वच विभागांत विविध वर्गवारीतील ग्राहकांचे देयक थकलेले आहे.
वारंवार केलेल्या आवाहनास दाद न मिळाल्याने महावितरणने कायदेशीररीत्या वीज जोडणी कापण्यास सुरुवात केली आहे.
नाशिक शहर मंडळात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक अशा ७०६५५ ग्राहकांचे ९.२६ कोटी रुपये थकीत आहेत. कृषीपंपधारक १८२०६ ग्राहकांचे १३.१३ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
नाशिक ग्रामीण मंडळातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील एक लाख ४८ हजार ग्राहकांकडे २७.८२ कोटी रुपये थकले आहेत. कृषिपंपधारक २,४३,८९६ ग्राहकांकडे ४२६.९६ कोटी रुपये थकले आहेत. नाशिक जिल्ह्यातील १३५६ पाणीपुरवठा योजनांकडे विद्युत देयकांचे १०.१४ कोटी रुपये थकले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2014 1:02 am

Web Title: nashik district consumer have mahavitaran 487 crore of outstanding
Next Stories
1 नाशिक रोड जाळपोळप्रकरणी तीन संशयित ताब्यात
2 नाशिकरोड परिसरात वाहनांची जाळपोळ
3 कोकणात आंबा, काजूसाठी अतिदक्षतेचा इशारा
Just Now!
X