नाशिक जिल्ह्यामधील देवळा तालुक्यातील भावडबारी घाटात उतारावर ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तर  पाचजण जखमी झाले. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे.

चांदवड तालुक्यातील पुरी येथील भवर कुटूंबाने नुकतीच देवळा तालुक्यात शेती घेतली होती. शेतीकामासाठी ट्रॅक्टरने देवळ्याकडे येत असताना भावडबरी घाटात उतारावर ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून दोघांचा उपचारारम्यान मृत्यू झाला. यापैकी एकाचा मालेगाव येथे उपचारार्थ पाठवले असता मृत्यू झाला आहे.

three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
painganga river three drowned marathi news
नांदेड: पैनगंगा नदीपात्रात बुडून तिघांचा मृत्यू; मृतांमध्ये चुलतीसह दोन पुतणी, माहुर तालुक्यातील घटना
A woman and two little girls drowned in Panganga river yawatmal
महिलेसह दोन लहान मुलींचा पैनगंगा नदीत बूडून मृत्यू; आर्णीतील कवठा बाजार येथील घटना
four people drowned, died, Vasai, Mira Road
वसई आणि मिरा रोड मध्ये दुर्घटना, एकाच दिवशी ४ जणांचा बुडून मृत्यू

जखमींना देवळा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर मालेगाव येथे हलविण्यात आले. तर दोघांना उपचारा नंतर घरी सोडण्यात आले. आपघातात सुनिता विजय भवर (४०), सोनू विजय भवर(१४), भाऊसाहेब पर्बत काळे (४५), विजय मधुकर भवर(४५) यांचा मृत्यू झाला. तर मनिषा विशाल भवर(४०), रिया विशाल भवर(८), आशाबाई भाऊसाहेब काळे(४५), सुमन मधुकर भवर (५०) हे जखमी झाले.