सीताराम ऊर्फ मंच्या िशदे यांचे १३ मार्च २०१६ रोजी सकाळी १० वा. वयाच्या ७२व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुलगे, १ मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. राष्ट्रीय कबड्डी खेळाडू असलेले िशदे यांनी सिंहगड मंडलाकडून आपल्या खेळाची सुरुवात केली होती. एअर इंडिया या व्यावसायिक संघाकडून खेळताना त्यांनी माजी महापौर महादेव देवळे यांच्या बरोबरीने संघ उभारणीचे मोलाचे कार्य केले. आज एअर इंडिया संघ दिसतो तो अशा लोकांच्या समर्पणामुळे. परंतु उभ्या महाराष्ट्रात त्यांची ओळख हुलकावणीचा बादशहा अशीच आहे. त्यांच्या हूलचा भल्या भल्या खेळाडूंनी धसका घेतला होता.  कबड्डी खेळ सोडल्यानंतर ते वाशी येथील सेक्टर ९ येथे राहावयास गेले होते. गेली ३० वर्षे ते वाशीत वास्तव्यास होते. त्यांचे निधन झाल्याची वार्ता कळताच त्यांच्या समकालीन खेळाडू, क्रीडारसिक, नातेवाईक यांनी त्यांच्या वाशी येथील घरी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी व त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी केली. तुभ्रे येथील हिंदू स्मशानभूमीत रात्रौ ८.३० वा. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.