विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच पक्षांनी स्वतःला झोकून दिले आहे. विरोधकांचे मुद्दे खोडून काढत आपला मुद्दा मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड सुरू आहे. राजकीय पटलावर होत असलेल्या घटनांचे परिणाम मतदारांवर काय परिणाम होतात. राजकीय घडामोडी मागील कारणं, मुख्यमंत्री पदासाठी चेहरा म्हणून शिवसेनेनं पुढे आणलेल्या आदित्य ठाकरे यांना भाजपा संधी देणार का? या सगळ्यांकडं संपादक कसं बघतात? संपादकांच्या नजरेतून निवडणूक समजून घेण्याचा प्रयत्न ‘लोकसत्ता डॉट कॉम’ने केला आहे. न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे यांनी राज्यात होत असलेल्या निवडणुकीचं विश्लेषण केलं आहे.

महेश म्हात्रे यांनी केलेलं विश्लेषण येथे पहा-