News Flash

पुणे: नौदल कमांडरने पत्नीचे आक्षेपार्ह फोटो केले अपलोड, गुन्हा दाखल

पत्नीचे आक्षेपार्ह आणि मॉर्फ केलेले फोटो इंटरनेटवर अपलोड केल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी ३९ वर्षाच्या नौदल कमांडर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुणे: नौदल कमांडरने पत्नीचे आक्षेपार्ह फोटो केले अपलोड, गुन्हा दाखल

पत्नीचे आक्षेपार्ह आणि मॉर्फ केलेली छायाचित्रे फोटो अॅपवर अपलोड केल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी ३९ वर्षाच्या नौदल कमांडर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आपल्या नवऱ्याचे दिल्लीला पोस्टींग झाले असून त्याला पॉर्न पाहण्याचे व्यसन आहे असा आरोप पीडित महिलेने तिच्या तक्रारीत केला आहे. तक्रारदार महिला माजी लष्करी अधिकारी आहे.

नवरा त्याचे पॉर्नचे व्यसन सोडायला तयार नसल्याने ही महिला अलीकडेच तिच्या मुलाबाळांसह आई-वडिलांच्या घरी निघून गेली. मी आणि अन्य कुटुंबियांनी सुद्धा नवऱ्याचे पॉर्नचे व्यसन सोडवण्याचे बरेच प्रयत्न केले असे या महिलेने सांगितले. नवऱ्याच्या वागण्याला कंटाळलेली ही महिला पुण्यात रहात असून तिने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज देखील दाखल केला आहे.

दिल्लीहून पुण्याला येताना तिने नवऱ्याचा मोबाइल फोन सुद्धा सोबत आणला होता. हा फोन तपासताना नवऱ्याने तिचे आक्षेपार्ह फोटो ऑनलाइन अपलोड केल्याचे समजले. पीडित महिलेच्या नवऱ्याने तिच्याशिवाय सहकाऱ्यांच्या पत्नीचे आणि अन्य महिलांचे फोटो सुद्धा अॅपवर अपलोड केले होते.

आरोपीने त्याच्या ई-मेल अकांउटवरुन आक्षेपार्ह फोटो अपलोड केल्याचे पीडित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. आरोपीचे सहकाऱ्यांच्या पत्नीसोबतही प्रेमसंबंध होते असा आरोप पीडित महिलेने केला आहे. विविध कलमांतर्गत आरोपी नौदल कमांडर विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2018 5:58 pm

Web Title: navy officer booked in pune for uploading objectionable pics of wife
Next Stories
1 उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे पुणेकरांना हुडहुडी!
2 पिंपरी-चिंचवडच्या पाणीकपातीचा प्रस्ताव फेटाळला
3 अनधिकृत बांधकामांवर नियंत्रणसाठी दंड
Just Now!
X