News Flash

आई, बहिणीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नाही झाली पाहिजे – अजित पवार

"महिलांवरील अत्याचारासंदर्भात कडक कायदा आणला जात आहे"

आमचं सरकार कोणाच्या दडपशाहीने चालणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. महिलांवरील अत्याचारासंदर्भात कडक कायदा आणला जात असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. तक्रार आल्यास पोलिसांनी कारवाई करावी असं सांगताना अजित पवार यांनी हे सरकार कोणाच्या दडपशाहीने चालणार नाही. कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही असं आश्वासन दिलं. कर्जत जामखेडमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. “महिलांसाठी असा कडक कायदा आणणार आहोत ज्यामुळे आपल्या माता-भगिनींकडे वाईट नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही,” असंही यावेळी ते म्हणाले.

“महिलांवरील अत्याचारासंदर्भात कायदा आणला जात आहे. राज्यात जर एखाद्या महिलेची कोणती तक्रार असेल तर त्याची नोंद जिल्हाप्रमुख, पोलिसांनी घरातील काम समजून त्यात लक्ष घातलं पाहिजे,” असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. अजित पवारांनी यावेळी महिलांना विधानसभा आणि लोकसभेला आरक्षण द्यावं अशी आमची भूमिका असल्याचं सांगताना पण यावर देशात सगळ्याचं एकमत झालं पाहिजे असं सांगितलं.

“पोलिसांचीही अनेक कामं हातात घेतली आहेत. १४ कोटींच्या गाड्या पोलिसांसाठी शहर आणि ग्रामीण भागात असतील. पोलिसांना पायाभूत सुविधा देण्याचं काम आम्ही करु. पण पोलिसांनीदेखील कायदा-सुव्यवस्थेकडे पूर्ण लक्ष देत सुरक्षा दिली पाहिजे,” असं अजित पवारांनी म्हटलं.

आणखी वाचा- “…माझी सटकली तर तुझी वाट लागेल”, अजित पवारांनी भरसभेत भरला दम

अजित पवारांनी यावेळी सीएए, एनसीआर, एनपीआर संबंधी बोलताना या कायद्याचा महाराष्ट्रातील एकाही नागरिकाला त्रास होऊ देणार नाही असं आश्वासन दिलं. “कोणाच्या सागंण्यावर जाऊ नका, कोणत्याही नागरिकाला त्रास होणार नाही. आम्ही जोपर्यंत सरकारमध्ये आहे तोपर्यंत तुमच्या केसाला धक्का लागणार नाही असा शब्द मी देतो,” असं अजित पवार म्हणाले आहेत.

आणखी वाचा- ‘करोना’ च्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा नाशिक दौरा रद्द

“ज्या मताधिक्याने तुम्ही आमच्या रोहितला निवडून दिलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आता यापुढे सर्व जबाबदारी आमची. आम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो हे सर्वांना माहिती. मी तुमच्या आणि रोहितच्या पाठीशी आहे. कर्जत जामखेड हा माझा आवडता मतदारसंघ आहे, या तालुक्यांशी माझे भावनिक नाते आहे.१२ पैकी ९ जागा निवडून दिल्या बद्दल मी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मतदारांचे आभार. तुमचं नाणं खणखणीत आहे ते आम्ही वाजवणारच,” असंही यावेळी अजित पवार म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 3:48 pm

Web Title: ncp ajit pawar on crime against woman in karjat jamkhed sgy 87
Next Stories
1 ‘करोना’ च्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा नाशिक दौरा रद्द
2 “राज ठाकरेंची वाणी तलवारीसारखी चालते आणि…”
3 “…याला काय अर्थ आहे?”; राज ठाकरेंनी व्यक्त केली मतदारांबद्दलची नाराजी
Just Now!
X