राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. एका तरुणाने जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट लिहिल्याने आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप तरुण करत आहे. यामुळे जितेंद्र आव्हाड यांचं नाव चर्चेत असून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. एकीकडे विरोधक जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत असून सोशल मीडियावरही संताप व्यक्त होताना दिसत आहे. अशातच एका तरुणाने जितेंद्र आव्हाड यांना तुझा दाभोलकर होणार असा इशाराच दिला असल्याने खळबळ उडाली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणावरुन सोशल मीडिया प्रतिक्रिया उमटत आहेत. यावेळी एका तरुणाने ट्विटरला कमेंट करताना ‘जितेंद्र आव्हाड तुझा दाभोलकर होणार’ असं म्हटलं आहे. यामुळे सध्या खळबळ उडाली असून पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलं आहे.

Devendra Fadnavis On Praful Patel Statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”; प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे सत्य…”
sangli Mahavikas Aghadi
मविआची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर होताच कॉंग्रेस संतप्त, बैठकीत पुढील निर्णय – आमदार सावंत
Rohit Pawars allegations against Eknath Khadse
रोहित पवार यांचा एकनाथ खडसे यांच्यावर आरोप, म्हणाले, ‘अटकेच्याच भितीने…’
NCP, sanjay Raut, sangli,
सांगलीत संजय राऊत यांच्या मदतीला राष्ट्रवादी का धावून गेली ?

काय आहे प्रकरण ?
राज्यात करोनानं चिंता वाढवलेली असताना जितेंद्र आव्हाड यांचं नाव एका प्रकरणामुळे मंगळवारपासून चर्चेत आलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट लिहिणाऱ्या तरुणाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप होत आहे. ठाण्यातील एका व्यक्तीनं जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे.

आणखी वाचा- मौका सभी को मिलता है ! जितेंद्र आव्हाडांना नितेश राणेंचा इशारा

माझ्या बंगल्यावर असा कोणताही प्रकार झाला नाही – आव्हाड
आरोप जितेंद्र आव्हाड यांनी फेटाळून लावले आहेत. “माझ्या बंगल्यावर असा कोणताही प्रकार झाला नाही. या घटनेबद्दल मला माहिती नाही. मी रात्री झोपलेला होतो. त्या दिवशी मी दिवसभर माझ्या विभागात काम करत होतो. त्यामुळे रात्री घरी येऊन झोपलो. मी मारहाणीचे समर्थन करणार नाही, पण त्याने जी पोस्ट माझ्याबद्दल टाकली. तशी पोस्ट कोण सहन करेल? माझा नग्न फोटो टाकला होता. असे फोटो त्याच्या नातेवाईकांबद्दल टाकल्यावर तो गप्प बसेल का? भाजपाचे नेते तरी हे सहन करतील का?,” अशी भूमिका आव्हाड यांनी मांडली आहे.