News Flash

येइयो अंबानी माझे माउली ये; जितेंद्र आव्हाड यांची खोचक आरती

राफेल करार तसेच नरेंद्र मोदी हे विष्णूचे अकरावे अवतार असल्याचे भाजपा नेत्याच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी  ट्विटरवर ही आरती पोस्ट केली.

संग्रहित छायाचित्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विडंबनात्मक आरती सोशल मीडियावर पोस्ट करुन सत्ताधारी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘येइयो अंबानी माझे माऊली ये, अकरावा आवतार रफेल वर स्वार होसी, अंबानी ला घेऊन तो फ्रान्स ला जासी, अशी विडंबनात्मक आरतीच त्यांनी ट्विट केली आहे.

राफेल करार तसेच नरेंद्र मोदी हे विष्णूचे अकरावे अवतार असल्याचे भाजपा नेत्याच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी  ट्विटरवर विडंबनात्मक आरती टाकून सरकारवर निशाणा साधला.

आव्हाड यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?
येइयो अंबानी माझे माउली ये ।।
येइयो अंबानी माझे माऊली ये !!!
अकरावा आवतार रफेल वर स्वार होसी!!
अंबानी ला घेऊन तो फ्रान्स ला जासी !
डसाल्ट कंपनीचे तयाला कॉन्ट्रॅक्ट मिळवून देसी।
दोघे मिळोनी भारत देश विकाया नेशी!!!

येइयो अंबानी माझे माउली ये ।।
येइयो अंबानी माझे माऊली ये !!!

दरम्यान, दारु घरपोच देण्याच्या निर्णयावरुनही आव्हाड यांनी टीका केली. खरतर घरामध्ये वीज, पाणी, रेशन पोहचविण्याची सरकारची जबाबदारी आहे. पण, ते त्यांच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे दारू पिऊन टाईट व्हा आणि सगळे विसरा या भूमिकेत आता सरकार आलेल दिसतय, अशी टीका त्यांनी केली.

तसेच छत्रपती शिवाजी राजे,संभाजी राजे,तुकाराम महाराज ह्यांचा खोटा इतिहास किंवा बदनामी सर्व शिक्षा अभियान मार्फत केली जात आहे. पुस्तक न तपासता आलीच काशी की जाणून बुजून आणली गेली, महापुरुषांच्या बदनामीला जबाबदार कोण ?, असा सवाल त्यांनी विचारला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 10:29 am

Web Title: ncp leader jitendra awhad hits out at pm narendra modi over rafale deal in aarti
Next Stories
1 घरपोच दारुचा निर्णय नाहीच, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
2 ‘महिलांचा अपमान करणाऱ्या सरकारला शिवाजी महाराजांचे आशिर्वाद कसे लाभणार?’
3 धक्कादायक..! तोकड्या कपड्यांमुळे विद्यार्थिनीस केले नग्न, एसएनडीटीमधील घटना
Just Now!
X