राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे दिलासा मिळाला. महादेव कोळी आणि कोळी महादेव या दोन्ही जाती एकच असून त्या आदिवासी असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. काही महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पिचड यांचे महादेव कोळी जातीचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द ठरवले होते. तसेच त्यांना कोळी महादेव जातीचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

नागपूर येथील महाराष्ट्र आदिवासी मन्ना जमात मंडळाने मधुकर पिचड यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. पिचड यांच्या अनुसूचित जमात प्रमाणपत्रामुळे आदिवासी समाजाचे नुकसान झाल्याचा दावा राज्य आदिवासी मन्न जमात मंडळाने याचिकेत केला होता. पिचड हे कोळी महादेव जातीचे असताना त्यांनी महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते, असे आदिवासाी मन्ना जमातीने म्हटले होते. त्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. मात्र, आता न्यायालयाने महादेव कोळी आणि कोळी महादेव या दोन्ही जाती एकच असल्याचे स्पष्ट केल्यामुळे पिचड यांच्यासह तमाम महादेव कोळी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Patanjali
“जाहिरातींच्या आकाराएवढा माफीनामा छापला का?” रामदेव बाबांना SC ने फटकारले; न्यायमूर्ती म्हणाल्या “मायक्रोस्कोप घेऊन…”
supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
“आम्ही तुमची माफी स्वीकारणार नाही, कारवाईला सामोरे जा”; बाबा रामदेव यांचा माफीनामा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
chief justice dy chandrachud
सरन्यायाधीश कोर्टात आले आणि आपली खुर्ची सोडून चक्क समोरच्या स्टूलवर जाऊन बसले; ‘या’ कृतीचं होतंय सर्वत्र कौतुक!

मधुकर पिचड हे यापूर्वीच्या सरकारमध्ये आदिवासी विकासमंत्री होते. २०१५मध्ये नाशिक येथील सर्वपक्षीय आदिवासी मेळाव्यात पिचड यांनी आदिवासी समाजासाठी स्वतंत्र राज्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणीही केली होती. आमदार आणि मंत्री असल्यामुळे माझ्यावर काही मर्यादा होत्या. मात्र, आता मला कोणतीही बंधने नसल्याने मी आदिवासींच्या भल्यासाठी खुलेपणाने काम करू शकतो, असे त्यांनी यावेळी म्हटले होते.