News Flash

अनिल देशमुख- परमबीर सिंगांचा थांगपत्ता विचारणाऱ्या विरोधी पक्षाला नवाब मलिकांचा टोला; म्हणाले…

‘आधी चोर्‍या-नंतर बहाणे’ अशाच वर्गवारीत मोडणारा आहे.” अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली होती.

अनिल देशमुख- परमबीर सिंगांचा थांगपत्ता विचारणाऱ्या विरोधी पक्षाला नवाब मलिकांचा टोला; म्हणाले…

अनिल देशमुख, परमबीर सिंग सध्या कुठे गायब आहेत हे राष्ट्रवादीने जाहीर करावं, असं आवाहन करणाऱ्या प्रवीण दरेकरांना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. सीबीआय-ईडी अनिल देशमुखांना शोधत आहेत पण ते सापडत नाहीत आणि याबद्दल गृहविभागाला काही माहिती नाही, हे आश्चर्यच असल्याची टीका प्रवीण दरेकरांनी केली होती. त्यावरच आता नवाब मलिकांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

याबद्दल बोलताना नवाब मलिक म्हणाले, “ते त्यांच्या कुटुंबासोबत आहेत, राज्यात आहेत, देशात आहेत. पण तरीही ते फरारी आहेत का? हद्दपार आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्यांच्या पक्षाने नेते हद्दपार आहेत, ज्यांच्या पक्षाचे लोक फरारी आहेत त्यांनी याप्रकरणी प्रश्न विचारू नयेत”.

काय म्हणाले होते प्रवीण दरेकर, येथे वाचा…

“स्वत:ला अपयश आले की केंद्रावर आरोप, करोना वाढला की सामान्य जनतेवर आरोप, खरे तर आरोप करण्याशिवाय या सरकारचे मंत्री काहीच करीत नाहीत. रोज सकाळी मीडियाला अजेंडा ठरवून देऊन सरकार चालत नसते, त्यासाठी परिश्रम करावे लागतात. आरोप झाले की कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार, अशी विधाने करायची आणि नोटीस आली की बिळात लपून बसायचे. तुम्ही जर काही केले नसेल तर चौकशीला का घाबरता? का तुमचे सहकारी दोन-तीन महिन्यांपासून फरार आहेत? त्यामुळे हा संपूर्ण प्रकार म्हणजे ‘आधी चोर्‍या-नंतर बहाणे’ अशाच वर्गवारीत मोडणारा आहे.” अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली होती.

“तुमच्यावर सरकार म्हणून कुठल्याही प्रकारचा विश्वास नाही. आपलं नियंत्रण नाही असं समजायचं का?, राज्यातील अधिकाऱ्यांनी सातत्याने राज्याच्या विकासासाठी सरकार कोणाचेही असो त्याला समर्थन दिले आहे व सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. पण तुमचे उद्देशचं या ठिकाणी जनहिताचे नसतील आणि व्यक्तिगत स्वार्थाचे काही निर्णय असतील तर अधिकारी अशावेळी मदत करत नसतात. जर चुकीचे होत असेल तर विरोधीपक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माहिती जात असेल. मात्र ठरवून देवेंद्र फडणवीस यांना माहिती देण्याचे काही कारण नाही.” असे दरेकर म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2021 11:34 am

Web Title: ncp leader nawab malik criticises bjp and pravin darekar vsk 98
Next Stories
1 “थोबाडीत मारली तरी…”; चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांचा संदर्भ देत केलेल्या वक्तव्यावरुन विरोधक, सत्ताधारी आमने-सामने
2 …म्हणून मी राजीनामा दिला; संजय राठोडांनी दिलं राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण
3 ओबीसी आरक्षण प्रश्न : मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक; मोठ्या निर्णयाची शक्यता
Just Now!
X