राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना डेंग्यूची लागण झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. मला डेंग्यूचे निदान झाल्याने सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र मदत आणि पुनर्वसन उपाययोजना वेगात करण्यासाठई मी आणि माझी टीम संबंधित शासकीय अधिकाऱ्यांसोबत संपर्क आणि समन्वय साधत आहोत. पुणे जिल्हाधिकारी, पुणे आयुक्त यांनीही देखील पूर्ण मदतीचे आश्वासन दिले आहे असंही ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरही याबाबतची माहिती दिली आहे.
मला डेंग्यूचे निदान झाल्यामुळे सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे, परंतु मदत आणि पुनर्वसन उपाययोजना वेगात करण्यासाठी मी आणि माझी टीम, संबंधित शासकीय अधिकाऱ्यांसोबत संपर्क आणि समन्वय साधत आहोत. @CollectorPune आणि @PMCPune आयुक्त यांनी देखील संपूर्ण मदतीचे आश्वासन दिले आहे.
— Supriya Sule (@supriya_sule) September 26, 2019
ऐन प्रचाराच्या धामधुमीत सगळ्यांसोबत खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी मी सज्ज आहे. मात्र डासांचा उच्छाद अखेर भोवला, मला डेंग्यूची लागण झाली असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 27, 2019 5:02 pm