04 March 2021

News Flash

पुढील सहा तासांत चक्रीवादळाची तीव्रता कमी होणार; हवामान विभागाची माहिती

वादळ ईशान्य दिशेला वळणार असल्याची हवामान खात्याची माहिती

निसर्ग चक्रीवादळानं रौद्ररुप धारण केलं असून, किनारपट्टी भागासह राज्यात अनेक ठिकाणी वादळा पाऊस सुरू झाला आहे. वाऱ्याची गती वाढली असून, समुद्रालाही उधाण आलं आहे. लाटा किनाऱ्याला धडका मारू लागल्या आहेत. या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसानही झालं आहे. परंतु पुढील सहा तासांमध्ये या वादळाची तीव्रता कमी होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली.

वादळाचा परीघापैकी काही भाग अजूनही समुद्रावरच आहे. संपूर्ण वादळ जमीनीवर दाखल होण्यासाठी अजून किमान एक तासाचा वेळ लागेल. सध्या मध्यभागी या वादळाची तीव्रता ९०-१०० किलोमीटर प्रती तास ते ११० किलोमीटर प्रती तास इतकी आहे. पुढील सहा तासांत हे चक्रीवादळ ईशान्य दिशेला वळणार असून त्याती तीव्रताही कमी होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली.

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. निसर्ग चक्रीवादळात कोणतीही जीवीतहानी होऊ नये यासाठीही सर्व व्यवस्था केली जात असून लोकांना सुरक्षितस्थळी हलववण्यात आलं आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) २१ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून आतापर्यंत त्यांनी १ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे अशी माहिती एनडीआरएफचे व्यवस्थापकीय संचालक एस एन प्रधान यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 3:05 pm

Web Title: nisarga cyclone will move northeastwards and weaken into a cyclonic storm during next 6 hours imd jud 87
Next Stories
1 “आम्ही तुमच्या पाठिशी आहोत’, उद्धव ठाकरेंसाठी केजरीवालांचं ट्विट
2 घरातून बाहेर पडू नका, सरकारच्या सूचनांचं पालन करा; सुप्रिया सुळेंचं जनतेला आवाहन
3 महाराष्ट्रात NDRF च्या २१ तुकड्या तैनात, तब्बल एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं
Just Now!
X