16 December 2017

News Flash

नितीन गडकरी यांनी पक्षाची सक्रिय सदस्यता स्वीकारली

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी रविवारी पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व

खास प्रतिनिधी, नागपूर | Updated: January 7, 2013 6:58 AM

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी रविवारी पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ३०० रुपये देऊन पक्षाची सक्रिय सदस्यता स्वीकारली. महालमधील त्यांच्या निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
महाल क्षेत्रातील प्रभागक्रमांक ४१मध्ये नितीन गडकरी राहतात. पक्षाच्या मध्य मंडळाचे अध्यक्ष गुड्डू त्रिवेदी व सदस्यता प्रमुख विनय रोडे, आशीष चिटणीस यांच्याजवळ नितीन गडकरी यांनी ३०० रुपये दिले आणि सक्रिय सदस्यत्वाची पावती स्वीकारली. त्यानंतर माजी नगरसेवक मजिद शोला, राजू जनबंधु, मो. सलमान, मुजैदखान, एहजाज शेख, शाबद खान, रोहित इलपाची, विकास बोपचे, संघर्ष दांडेकर, संजय ठाकुर, वासिमखान, हेमंत निखारे, प्रमोद रेपाडे, आकाश ढोमणे, दयानंद यादव, राकेश घोडेस्वार, सोनू गुप्ता, मुस्तफा खान, राजू शेख, न्याज शेख असद शेख यांच्यासह दीडशे रिपाइं कार्यकर्त्यांंनी प्रवेश घेतला. गडकरी यांनी त्यांचे स्वागत केले. नागपुरात भाजपचे तीन लाख सात हजार पाचशे प्राथमिक व तीन हजार सक्रिय सदस्य झाले. कार्यकर्त्यांच्या परिश्रमानेच हे शक्य झाले. लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रभागस्तरावर पक्ष मजबुत होण्यात त्याची मदत होईल, या शब्दात गडकरी यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

First Published on January 7, 2013 6:58 am

Web Title: nitin gadkari renews bjp membership