News Flash

दीड वर्षांपासून सुटी न मिळाल्याने ट्रॅकमनची रेल्वेखाली आत्महत्या, संतप्त कर्मचाऱ्यांचा रेल रोको

बबलू कुमार असे या ट्रॅकमनचे नाव असून तो मुळचा बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मोबाइलवर व्हिडिओ तयार केला आहे.

दीड वर्षांपासून रेल्वेतील अधिकारी सुटी देत नसल्यामुळे ट्रॅकमनने रेल्वेखालीच आत्महत्या केली. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील वाम्बोरी रेल्वे स्थानकाजवळ आज (बुधवार) सकाळच्या सुमारास घडली. बबलू कुमार असे या ट्रॅकमनचे नाव असून तो मुळचा बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील आहे.

दीड वर्षांपासून रेल्वेतील अधिकारी सुटी देत नसल्यामुळे ट्रॅकमनने रेल्वेखालीच आत्महत्या केली. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील वाम्बोरी रेल्वे स्थानकाजवळ आज (बुधवार) सकाळच्या सुमारास घडली. बबलू कुमार असे या ट्रॅकमनचे नाव असून तो मुळचा बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील आहे. बबलू कुमारने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाइलवर व्हिडिओ तयार केला असून मागील दीड वर्षांपासून आपल्याला  वरिष्ठ अधिकारी सुटी देत नसल्याने आत्महत्या करणार असल्याचे म्हटले होते. वाम्बोरी हे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय कार्यालयांतर्गत येते. घटनास्थळी रेल्वे अधिकारी आणि पोलिसांनी धाव घेतली आहे. दरम्यान, घटनास्थळी गेलेल्या सहाय्यक अभियंत्याला रेल्वे कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात येते. संतप्त कर्मचाऱ्यांनी म्हैसूर-वाराणसी एक्स्प्रेस रोखून धरली आहे. कर्मचाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न रेल्वे अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. त्याचबरोबर बबलू कुमार सुटी मंजूर केली होती, असे स्पष्टीकरणही दिले आहे.

अधिक माहिती अशी, बबलू कुमार हा मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय कार्यालयात २८ फेब्रुवारी २०१६ ला ट्रॅकमन म्हणून रूजू झाला होता. तो वाम्बोरी रेल्वे स्थानकाच्या यूनिट क्रमांक १८ येथे तैनात होता. त्याने मंगळवारी २८ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत अशी १० दिवसांची सुटी मागितली होती. आपल्याला सुटी न देता अपमान करून हाकलून देण्यात आल्याचे बबलू कुमारने व्हिडिओत म्हटले होते. एप्रिल २०१७ पासून मला रजा दिलेली नाही. जेव्हा मी रजा मागायला जातो तेव्हा मला अपमान करून, शिवीगाळ करून परत पाठवले जाते. गेल्या दीड वर्षांपासून मी माझ्या कुटुंबीयांपासून दूर आहे. अशी नोकरी करून उपयोग काय, असा सवाल त्याने व्हिडिओत केला आहे. व्हिडिओत त्याला अश्रू अनावर झाले होते. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण तो कोणाचेच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. माझा हा व्हिडिओ रेल्वेमंत्री आणि रेल्वेच्या अध्यक्षांपर्यंत पोहोचवा. काम करूनही आमच्यावर कशा प्रकारे अन्याय केला जातो, हे त्यांना माहीत व्हावं, असे त्याने व्हिडिओत म्हटले होते.

दरम्यान, आज सकाळी मुंबई-शिर्डी फास्ट पॅसेंजरखाली त्याने आत्महत्या केली. बबलू कुमारने आत्महत्या केल्याचे समजताच संतप्त रेल्वे कर्मचाऱ्यांनी म्हैसूर-वाराणासी एक्स्प्रेस रोखली. घटनास्थळी सहाय्यक अभियंत्यांनी धाव घेतली. पण कर्मचाऱ्यांनी त्यांना धक्काबुक्की केली. परंतु, रेल्वेने यासंबंधी बबलू कुमारला सुटी मंजूर केली होती, असे स्पष्टीकरण दिले आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवले असून कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 2:45 pm

Web Title: not permitted for leave from one and a half years railway track man committed suicide in ahmadnagar district
Next Stories
1 पैशांच्या कारणावरून जामखेडमध्ये एसटी वाहकावर गोळीबार
2 ध्वजारोहणावेळी सोलापुरात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
3 नागपूरमध्ये संघ मुख्यालयात ध्वजारोहण
Just Now!
X