16 October 2019

News Flash

नागपुरात वृद्ध दांपत्याची हत्या, डोक्यावर लोखंडी रॉडने करण्यात आला हल्ला

पोलिसांनी चोरी किंवा घरफोडीच्या उद्देशाने हत्या करण्यात आली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे

नागपुरात एका वृद्ध दांपत्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाडी परिसरात ही घटना घडली आहे. मुलीने पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दोघेही आपल्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं. पोलिसांनी चोरी किंवा घरफोडीच्या उद्देशाने हत्या करण्यात आली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

शंकर चंपाती (७०) आणि सीमा चंपाती (६०) अशी हत्या करण्यात आलेल्या दांपत्याची नावं आहेत. सुरक्षानगर परिसरात दोघे राहत होते. शंकर चंपाती यांचा दत्तवाडी चौकात नारळ पाणी विक्रीचा व्यवसाय होता. सीमा चंपाती गृहिणी होत्या. त्यांची मुलगी प्रियंका चंपाती खासगी कंपनीत नोकरी करत असून रात्री आठ वाजता घरी परतली असता तिला घरात दोघांचे मृतदेह आढळले.

डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करत चंपाती दांपत्याची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी लूट किंवा घरफोडीच्या उद्देशाने हत्या झाली असावी असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र यामागे अन्य कोणतं कारण आहे का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

First Published on April 15, 2019 9:12 am

Web Title: old couple killed in nagpur