04 March 2021

News Flash

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर टेम्पोचा अपघात, चालक जखमी

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. यात चालक जखमी झाला असून टेम्पोमधील कोंबडीची पिल्ल दगावली. हा टेम्पो उरली कांचन येथून पुण्याच्या दिशेने जात

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. यात चालक जखमी झाला असून टेम्पोमधील कोंबडीची पिल्ल दगावली. हा टेम्पो उरली कांचन येथून पुण्याच्या दिशेने जात होता. ही घटना पहाटे पाचच्या सुमारास घडली. अपघात झाल्यानंतर टेम्पोमधून पिल्लं बाहेर आली आणि सैरावैरा पळत सुटली यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन टेम्पो पलटी झाला. या अपघातात चालक जखमी झाला असून कोंबडीची बरीच पिल्लं दगावली तर काही पिल्लं रस्त्यावर सैरावैरा धावू लागली. यामुळं बराच काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

हा अपघात पहाटे पाचच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफ समोर झाला. गाडी रस्त्याकडेला पलटी झाली. अपघाताचा मोठा आवाज आल्याने,घाबरून कोंबडीची काही पिल्लं दगावली तर काही सैरावैरा झाली.यामुळं बराच काळ वाहतुल विस्कळीत झाली. अद्याप वाहन चालकाचे नाव समजलेले नाही. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 1:23 pm

Web Title: on mumbai puna road tempo accident
Next Stories
1 बँक ऑफ महाराष्ट्र प्रकरण: पाच अधिकाऱ्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
2 खाद्यपदार्थाचे दर कमी करा; अन्यथा खळ्ळ खटय़ाक!
3 इमारत गळतीचे पालिका सभागृहात तीव्र पडसाद
Just Now!
X