पुण्याच्या कॅम्प भागातील आबेदा इनामदार महाविद्यालयातील आणखी एका विद्यार्थ्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी मुरूडमधील समुद्रातून बाहेर काढण्यात आला. या महाविद्यालयातील एकूण १४ विद्यार्थ्यांचा सोमवारी दुपारी समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. मृतांमध्ये १० मुली आणि चार मुलांचा समावेश आहे. तटरक्षक दल, नौदल आणि स्थानिक मच्छीमार या सर्वांनी मंगळवारी सकाळी शोधमोहीम राबवत १४ विद्यार्थ्यांचा मृतदेह समुद्रातून बाहेर काढला. मडकी सैफ अहमद असे या मुलाचे नाव आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रायगडमधील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
आबेदा इनामदार महाविद्यालय प्रशासनाविरोधात पालक संतप्त
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या १३० विद्यार्थ्यांची सहल सोमवारी मुरुडला गेली होती. त्यापैकी १४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. हे सर्वजण पुण्यातील राहणारे आहेत.
दुपारी जेवण करून समुद्रात आतमध्ये गेल्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने २१ जण बुडाले. ही घटना कळताच मच्छिमारांनी लगेचच समुद्रात उतरून बुडणाऱ्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. पाण्यात बुडून १४ जणांचा मृत्यू झाला असून, या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सात जणांना वाचविण्यात यश आले. मृत पावलेले सर्वजण १८ ते २२ वयोगटातील आहेत.
शोकाकुल आझम कॅम्पस आणि पालकांचे हुंदके