कांदा निर्यात मूल्यात दुपटीने वाढ करूनही घाऊक बाजारातील भाव कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. देशांतर्गत बाजारातून प्रथम दर्जाचा कांद्याची आवक कमी झाल्याने नाशिकच्या कांद्याची मागणी वाढली असून यामुळे बुधवारी प्रती क्विंटलला कांद्याचे भाव १२५ रुपयांनी वधारले आहे. लासलगाव बाजारात कांद्याला सरासरी १६२५ रुपये भाव मिळाला. इतर बाजार समित्यांमध्येही असेच चित्र होते. नाशिकच्या प्रथम दर्जाच्या कांद्याची मागणी वाढली आहे. हे भाव वधारण्यास कारण ठरल्याचे व्यापारी नितीनकुमार जैन यांनी सांगितले.