19 September 2020

News Flash

राजीनामा मागण्याचा अधिकार केवळ अमित शाहंकडे : सुधीर मुनगंटीवार

'सत्य परेशान हो सकता है, पराजित नही हो सकता' असे सांगत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचा राजीनामा मागणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले

(संग्रहित छायाचित्र)

अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, त्यावर बोलताना माझा राजीनामा आमच्या पक्षाचे अध्यक्ष अमित शाह मागू शकतात, इतर कोणालाही राजीनामा मागण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली आहे.

अवनी वाघीण नरभक्षक झाली होती, त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसारच तिचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे कोणतेही उल्लंघन झाले नाही. ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नही हो सकता’ असे सांगत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचा राजीनामा मागणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले. तसेच माझा राजीनामा मनेका गांधी नव्हे भाजपा अध्यक्ष अमित शाह मागू शकतात. इतर कोणालाही राजीनामा मागण्याचा अधिकार नाही,असेही ते म्हणाले.

पिंपरीतील एच.ए मैदानावर आतंरराष्ट्रीय फुलांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, सच परेशान हो सकता है पराजित नही हो सकता. सच सच होता है. राजीनाम्याची मागणी केल्याने माझं खातं जात नाही किंवा कोणी मागणी केल्याने माझं प्रमोशनही होत नाही. राजीनाम्याविषयी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शाह किंवा देशाचे पंतप्रधान ठरवतील, तेव्हा राजीनाम्यावर निर्णय होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2018 3:31 pm

Web Title: only amit shah can ask my resignation and truth can not be defeated says sudhir mungantiwar on murder of tigress avni
Next Stories
1 डीएसकेंच्या अडचणीत आणखी वाढ, ‘महारेरा’ने दिला दणका
2 नागपूर : भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी मागितली लाच; दोघांना अटक
3 मराठा आरक्षण: मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर
Just Now!
X