27 February 2021

News Flash

Video : उद्धव ठाकरेंवर टीका; शिवसैनिकांनी भाजपा कार्यकर्त्याच्या तोंडाला फासलं काळं

शिवसैनिकांनी हे कृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल

पंढरपूर : शिवसेनेचे कार्यकर्ते एका भाजपा कार्यकर्त्याच्या तोंडाला काळ फासत त्याला भर बाजारातून नेताना दिसत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह आणि एकेरी भाषेत टीका केल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून पंढरपूरमधील भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांच्या तोंडाला काळं फासत त्याला साडी नेसवल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा प्रकार म्हणजे शिवसेनेची सत्तेची मस्ती आणि गुंडगिरी असल्याचं भाजपानं या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. दरम्यान, हे कृत्य करणाऱ्या १७ जणांवर गुन्हा दाखल झाला असून या सर्वांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सोलापूर पोलिसांनी दिली.

व्हायरल व्हिडिओत शिरीष कटेकर शिवसेनेचे काही कार्यकर्ते घेरतात आणि त्याच्या अंगावर डोक्यावर काळी शाई ओतताना दिसत आहेत. तसेच भर बाजारातून त्याची धिंड काढताना त्याच्या गळ्यात माळ सदृश्य वस्तू घालताना आणि अंगावर साडी टाकतानाही दिसत आहेत. आक्रमक झालेले हे कार्यकर्ते कटेकर यांना मारहाण आणि शिवीगाळही करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

दरम्यान, भाजपाच्या सरचिटणीस आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. किती ही सत्तेची मस्ती अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2021 9:13 am

Web Title: over the criticism on uddhav thackeray shiv sena made the bjp workers mouth black aau 85
Next Stories
1 मोदी न्यायव्यवस्थेबद्दल जे सांगतायेत, त्यावर विश्वास कसा ठेवायचा? -शिवसेना
2 Coronavirus – राज्यात मागील २४ तासांत २ हजार ६७३ नवे करोनाबाधित, ३० रुग्णांचा मृत्यू
3 … आणि दोन्ही वेळी शिवसेना पूर्वीपेक्षा अधिक बळकटीने पुढे आली – संजय राऊत
Just Now!
X